एखाद्या व्यक्तीला बघून सेक्स ची इच्छा मनात येणं नैसर्गिक आहे. पण त्या व्यक्तीसोबतच सेक्स करता येतो का ? तर नाही. हे तुम्हाला देखील माहिती असेलंच. कोणत्याही व्यक्तीसोबत सेक्स करताना समोरच्या व्यक्तीची इच्छा, संमती,
सुरक्षितता या गोष्टी महत्वाच्या आहेत.
याचबरोबर सेक्स ही एक जबाबदार कृती आहे. एखाद्या व्यक्तीला, विशेषतः अशा जवळच्या नात्यामधील व्यक्तीला सेक्सविषयी विचारल्यावर समोरच्या व्यक्तीची जी काही प्रतिक्रिया असेल आणि त्याचा तुमच्या भावी नात्यावर जो काही परिणाम होईल; त्याची मानसिक तयारी ठेवणे, जबाबदारी घेणे आवश्यक आहे.
भाऊ-बहिणी, आई मुलगा सारख्या रक्ताच्या नात्यातील लैंगिक संबंध हे समाजात निषिद्ध समजले जातात. त्यांना समाजमान्यता नाही. असे संबंध त्यात सामील व्यक्तींच्या मनावरही कायमचा ओरखाडा ठेवून जातात आणि भावी नातेसंबंधावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.