प्रश्नोत्तरेCategory: Public Questionshi. male 24 . musturbation karane changale ahe kay . kiti vela kele pahije . mala musterbation avadate. kahi side effect ahet kay?
1 उत्तर

मास्टर्बेशन ही एक सुखद, आनंद देणारी, इतरांना इजा न पोचवणारी क्रिया आहे. त्यात वाईट, घाण, पाप असं काही नाही. स्वतःच्या शरीराला सुख देण्यामध्ये वाईट काय असणार? मात्र हे करताना कोणत्याही टोकदार, धोकादायक वस्तूंचा वापर करू नका. ज्याने तुम्हाला, तुमच्या शरीराला इजा होईल अशा प्रकारे मास्टर्बेट करू नका.
दिवसातून कितीदा – हे ठरवायला हस्तमैथुन काही औषध नाही. आपली रोजची कामं, रोजचं आयुष्य, नोकरी, काम धंदा, छंद, अभ्यास, भेटीगाठी या सगळ्यांमध्ये अडथळा येणार नाही हे मात्र पहा. ‘आपण तेवढंच करत बसतो आहोत का’ हा प्रश्न स्वतःला विचारून पहा. बाकीच्या गोष्टी नेहमीसारख्या चालू असतील तर किती वेळा या प्रश्नाला फार महत्त्व नाही.
 

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 7 =