प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsmale cha jasa hastmaithun kelyavar viraya baher yete tase ladies ni hatamaithun kelyavar viraya baher yete ka? ladies la fakt sex cha savedna asatat
1 उत्तर

मुली आणि स्त्रिया हस्तमैथुन करतात. मुलींच्या लैंगिक अवयवांमध्ये क्लिटोरिस नावाचा एक अवयव असतो. लघवीच्या किंवा शूच्या जागेच्या थोडा वर या अवयवाचं टोक असतं. याला हात लावला, इतर वस्तूंनी त्याला स्पर्श केला किंवा क्लिटोरिस घासलं गेलं तर लैंगिक उत्तेजना निर्माण होते. मुलींमध्ये स्तनाग्रंदेखील अतिशय संवेदनशील असतात. स्तनाग्रांना स्पर्श करणं, ती ओढणं किंवा घासणं यातूनही उत्तेजना निर्माण होते. परंतू मुलींनी हस्तमैथुन केल्यावर वीर्य बाहेर येत नाही. पुरुषांना जसं वीर्य बाहेर आल्यानंतर सुख मिळतं तसंच सुख स्त्रीयांना देखील परमोच्च क्षणी मिळतं.

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 8 =