Masik pali asked 8 years ago

Mazi masik pali chi tarikh 7 hoti ajun mla masik pali ali nahi. Maz lagn 18 may la aahe . Kaykhabardari gheu ? Mala pali yeun javi as vattay . Nahitar mla golya ghyavya lagtil . Mla golya ghyayla nko vattat. Kay krave?

2 उत्तर
Answer for Masik pali answered 7 years ago

उत्तर सोप्पं आहे. गोळ्या घेऊ नका. ताण-तणाव, वजन कमी असणे, अत्याधिक व्यायाम, खूप कष्टाची कामं, अत्याधिक प्रवास, कुपोषण किंवा स्त्रीच्या शरीरात बीज निर्मिती आणि पाळीचक्रावर प्रभाव टाकणाऱ्या काही विशिष्ट संप्रेरकांशी (हार्मोन्स) संबंधित समस्या अशी अनेक कारणं पाळी वेळेवर न येण्याला कारणीभूत असू शकतात.

मासिक पाळी ही अतिशय नैसर्गिक क्रिया आहे त्यात घाण अपवित्र असे काहीही नाही. लग्न असो वा आणखी काही कशाला पाळी लांबवायची? अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/medicines-for-delaying-menstruation/

आपण आपल्या पाळीचा, आपल्या शरीराचा आदर करूया.

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 3 =