नमस्ते..
मला खुप भीती वाटते की माझी तब्यत कमी होईल कारण, माझे वजन पण दिवसेंदिवस कमी होत चाललय.
मला hiv वगैरे कोणताही आजार नाही डॉक्टर कडे पण गेलो सर्व टेस्ट पण केल्या माझं वजन नेमके कश्या मुळे कमी होत चाललय..? तोंडावर पिंपल्स पण आहे. माझ वय आत्ता २५ आहे
कृपया मला मार्गदर्शन करा
हस्तमैथुन ही एक आनंददायी स्वाभाविक म्हणजेच नॉर्मल क्रिया आहे. हस्तमैथुन केल्याने कमजोरी येते, तोंडावर पिंपल्स येतात, वजन कमी होते असे अनेक गैरसमज आहेत. अति प्रमाणात हस्तमैथुन करू नये म्हणून कधी कधी अशा गोष्टी सांगितल्या जातात.
तुमचे वजन कमी होण्यामागे कोणती कारणं आहेत हे सांगणे शक्य नाही परंतु हस्तमैथुन हे त्यामागचे कारण नाही. अति चिंतेमुळे, वेळी अवेळी खाण्यामुळे किंवा टेन्शनमुळे व्यवस्थित खाणं जात नसल्यास, झोप पूर्ण होत असल्यासही वजन कमी होतं. इतर काही शारीरिक आजार नाहीत ना याची तपासणी करून घ्या.
पिंपल्स किंवा ज्याला मुरुमं म्हणतात ते त्वचेशी संंबंधित असतात. शरीरात जे वेगवेगळे हार्मोन्स, किंवा संप्रेरक तयार होतात त्यामुळे पिंपल्स येतात. चेहरा साध्या पाण्याने नियमित धुवा. तेलकट खाणं कमी करा. चेहऱ्याला कोणतेही क्रीम किंवा इतर प्रसाधनं लावू नका. काही काळाने पिंपल्सची समस्या जाऊ शकेल. खूप प्रमाणातवर पिंपल्स येत असतील तर काही वेळा वैद्यकीय उपचार घ्यावे लागतात. चिंता करत राहू नका. यात घाबरण्यासारखं काही नाही.
जर का तुम्हाला सतत हस्तमैथुन करावेसे वाटत असेल, ते केल्याशिवाय तुम्हाला चैन पडत नसेल, तुमच्या दैनंदिन आयुष्यावर त्याचा परिणाम होत असेल तर मात्र तुम्हाला त्याचा विचार करावा लागेल. आपले लक्ष अभ्यासात, इतर कामांमध्ये, व्यायामामध्ये गुंतवा जेणे करून तुमच्या दैनंदिन आयुष्यावर विपरीत परिणाम होणार नाही व तुम्ही हस्तमैथुनातून योग्य तो लैंगिक आनंद मिळवू शकाल.