नाही. हस्तमैथुनाच्या अनेक गैरसमजांपैकी हा एक गैरसमज आहे. हस्तमैथुन ही एक सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. यामुळं शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. केस गळण्याची अनेक कारणं असू शकतात. यासाठी डॉक्टरांना भेटा ते तुम्हाला केस गळण्याची कारणं आणि उपाय सांगू शकतील.