प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsmasturbation kelyane vyakti rod(weak) hoto ka?

masturbation ati jast pramanat kelyas bhavishyat kahi problem hot nahi n??

plZ HELP

1 उत्तर

हस्तमैथुन ही क्रिया आनंद देणारी क्रिया आहे. त्याचे अनेक फायदे आहेत –

  • हस्तमैथुनामुळे आपल्या मनात स्वतःबद्दल छान भावना निर्माण होतात.
  • हस्तमैथुनाच्या क्रियेमध्ये आपल्याला दुसऱ्यांच्या भावना, इच्छा किंवा ध्येयांबद्दल चिंता करायची गरज नसते. पार्टनरबरोबरील सेक्समध्ये, पार्टनरच्या इच्छा, आकांक्षांना, गरजांना ध्यानात घ्यावे लागते. तिथे, व्यक्तींमध्ये एकमेकांबद्दल एका विशिष्ठ प्रकारची समज, एकमेकांमधील संवादाची गरज असते. परंतु हस्तमैथुनामध्ये व्यक्ती त्याला/तिला पाहिजे ते करू शकते. व्यक्ती स्वतःची कल्पना रंगवू शकते आणि स्वतःच स्वतःला लैंगिक आनंद देऊ शकते. अर्थात ते करताना स्वच्छता ठेवणे गृहीत आहे.
  • हस्तमैथुन, आपल्याला आपल्या शरीरातील केवळ लैंगिक अवयवच नाही तर इतर कोणत्या आवयांना स्पर्श केल्यावर आनंद मिळतो हे समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त कृती आहे. त्यामुळे आपल्या पार्टनरबरोबरील भविष्यातील लैंगिक जीवन सुखकर करण्याच्या दृष्टीने आपली मदत होऊ शकते.

त्यामुळे केवळ हस्तमैथुन केल्याने कोणताही त्रास होत नाही. मात्र रोजच्या आयुष्यात, कामात, अभ्यासात रस वाटेनासा ङोईल, इतर गोष्टींसाठी वेळ नाही, कुणाशी गाठीभेटी नाहीत फक्त हस्तमैथुन असं व्हायला लागलं तर भविष्यातच नाही वर्तमानातही समस्या निर्माण होऊ शकतात. अति तिथे माती ही म्हण लक्षात घ्या. आनंद मिळतोय तो नक्की उपभोगा मात्र कोणत्याच कृतीच्या आहारी जाणं टाळलेलं कधीही चांगलं नाही का?
 

आपले उत्तर प्रविष्ट करा

17 + 4 =