Maza prashn asked 7 years ago

mazi kakiaahetiche vay35 . Tikhup sundar diste tichyakde pahun mazya laingik bhavna jagya hotat maze vay20 Aahe mala tichya sobat sex karaychaaahe mi tila ajun   kadhi     tashi   vinanti   keli       nahi   matr,gharat     koni nastana tichya chahat zopechya   golya     taklya hotya tizopigelyavr   tiche   kiss ghetle mala rahvtnavhte mhnun tichi sadi varkaraycha   hipraytn   kela mala   kahi   hikarun tichya   sobat sex karava vatato   kay karave

1 उत्तर
Answer for Maza prashn answered 7 years ago

सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या काकीला चहातून झोपेच्या गोळ्या देऊन, ती शुद्धीत नसताना झोपेत जे काही कृत्य केलेत ते अत्यंत चुकीचे आहे. कोणत्याही व्यक्तीच्या नकळत, तिची संमती नसताना असं काही कृत्य करणं हा कायद्याने देखील गुन्हा आहे. तुमच्या बाबतीत कोणी असे तुमच्या नकळत कृत्य केले तर तुम्हाला चालेल का? त्यामुळे असले प्रकार ताबडतोब थांबवा.

तुम्हाला तुमच्या काकीविषयी शारीरिक आणि लैंगिक आकर्षण वाटते, पण त्यामुळे तिच्यावर काय परिणाम होईल, तुमच्या नात्यावर काय परिणाम होईल हे पाहण्याची जबाबदारी तुमची नाही का? कोणतेही लैंगिक संबंध ठेवत असताना समोरच्या व्यक्तीची देखील तितकीच इच्छा, संमती असणं आवश्यक आहे. शिवाय सेक्स ही अत्यंत जबाबदार कृती आहे. सेक्समध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींनी त्याच्या परिणामांची जबाबदारी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे.

लैंगिक इच्छा होणं किंवा लैंगिक आकर्षण वाटणं अगदी नैसर्गिक आहे पण लैंगिक कृती करत असताना मात्र ती विचारपूर्वक करायला पाहिजे. हस्तमैथुनासारखे सुरक्षित पर्याय वापरता येतील. तुमच्यासोबत स्वतःच्या मर्जीने लैंगिक संबंध ठेवण्यास एखादी व्यक्ती तयार असेल तर परस्पर संमती, समोरच्या व्यक्तीविषयी आदर, सुरक्षितता (कंडोमचा वापर, सुरक्षित जागा) या गोष्टींची काळजी घ्या. लैंगिक संबंधांतून मिळणाऱ्या आनंदासोबतच त्यातून होणाऱ्या परिणामांची जबाबदारी घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 17 =