सर्वप्रथम काळजी करणे सोडा. तुमचे लग्नापूर्वी जे नाते होते ते तुम्ही जर संमतीने निर्माण केले असेल तर त्यात वाईट वाटून घेण्याची काही आवश्यकता नाही. कधी, कोणाचे, कुणाशी शरीर संबंध आले हे ओळखण्याची सर्वसामान्य अशी काही पद्धत नाही. ते तुम्ही किंवा तुमच्या मित्राने किंवा आणखी कोणी उघड नाही केले तर कुणाला कळण्याचा काही प्रश्न नाही. कौमार्य (virginity) ही एक शारीरिक कमी आणि मानसिक कल्पनाच अधिक आहे जिचा अनावश्यक बागुलबुवा आपल्या समाजात उभा केला जातो. एखादी मुलगी कुमारी आहे का? तिचे पूर्व आयुष्यात कुणाशी संबंध आले आहेत का? अशा गोष्टी अपोआप कुणाला कळत नसतात. आणि आपल्या जोडीदाराचे पूर्व आयुष्य काय आहे त्यावर अवलंबून जर कोणी पुढील निर्णय घेणार असेल तर अशा नात्यात प्रवेश करताना थोडा अधिक विचार केलेलाच बरा. तुम्ही लग्न करत आहात, नव्या नात्यात प्रवेश करत आहात तेंव्हा आपल्या होणाऱ्या जोडीदाराशी संवाद वाढवा, एकमेकांना समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी द्या आणि घ्या सुद्धा. टेन्शन घेऊ नका. भावी आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा!!
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा