प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsMaze ling 4.5 ich ahe tar sex la problem nahi yenar na

2 उत्तर

काळजी करण्याचे कारण नाही. गर्भधारणा होण्यासाठी लिंगाची लांबी महत्वाची नसून, शुक्राणू स्त्रीबीजापर्यंत पोचतात की नाही यावर अवलंबून आहे. शात्रीयदृष्ट्या सागायचे तर लिंग योनीत जाऊन त्यात शुक्राणू पोहचवण्याइतपत पुरेसे लांब असावे.लिंगाची साईझ किती असावी यासाठी काही विशेष मापदंड नाही. प्रत्येकाच्या लिंगाचा आकार आणि लांबी वेगवेगळी असते. लिंग किती मोठं आहे यापेक्षा ते ताठ होतं का, संबंधाच्या वेळी ते ताठ राहतं का किंवा लैंगिक सुख मिळतं का, तुमच्या जोडीदाराला तुम्ही लैंगिक सुख मिळवून देऊ शकता का हे जास्त महत्त्वाचं आहे.

लिंगाचा आकार, लांबी आणि लैंगिक समाधान किंवा गर्भधारणा याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. बहुतेक वेळा पौरुष आणि जोडीदाराचे समाधान करण्याची क्षमता यांचा संबध लिंगाचा आकार आणि लांबी यांच्याशी लावतात. पण हा गैरसमज आहे. लिंगाच्या आकाराविषयी प्रश्न अनेकदा चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी यासंबंधी प्रश्न-उत्तरे अवश्य वाचा.https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 13 =