प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsMazi bayko garodar aahe mala evdya lavlar mul nako aahe me kay karu atta 1 mahina aaje

1 उत्तर

प्रेगा टेस्ट केल्या नंतरही डॉक्टर कडून प्रेग्नंसी कन्फर्म केलेली योग्य. एखाद्या फिजिशियन अथवा स्त्री रोग तज्ञ यांना प्रथम भेटा. प्रेग्नंसी कन्फर्म करा. गर्भधारणा किती दिवसांची आहे तेही तुम्हाला कळेल. प्रेग्नंसी असेल आणि मूल नको असेल तर योग्य त्या वैद्यकीय सल्ला घेऊन गर्भपात करणे हाच एकमेव सुरक्षित पर्याय आहे. कुठल्याही सरकार मान्य गर्भपात केंद्रात तुम्हाला ही सेवा मिळायला हवी.

गर्भपात करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रशिक्षित डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आणि मदतीशिवाय गर्भपात करणं जिवासाठी धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे डॉक्टरांकडे न जाता गर्भपात करण्याचा, त्यासाठी काही उपाय करण्याचा विचारही करू नकोस. अशा कोणत्याही उपायांनी गर्भपात होत नाही. उलट शरीराला आणि गर्भाशयाला गंभीर इजा होऊ शकते.

जितक्या जास्त लवकर गर्भपात करता येईल तितका चांगला. जास्त दिवस गेले तर त्यानंतर त्यातली गुंतागुंत वाढू शकते. पहिल्या महिन्यात किंवा दोन महिन्यात गर्भपात करणं जास्त जिकिरीचं नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि मदतीनेच हा निर्णय घेणं श्रेयस्कर आहे.

पुढे एक पत्ता दिला आहे, तिथे फोन करून चौकशी करून घ्या. ही संस्था सुरक्षित गर्भपाताची सेवा देते.

Family Planning Association of India,

Pune Branch, 101,

Western Court, 1082/1,

Ganeshkhind Road, Opposite E-Square Cinema,

Shivajinagar, Pune 411 016

Tel. No. : 020-65601453 to 65601457

अधिक माहितीसाठी तुम्ही 9075 764 763 या मर्जी हेल्पलाईनला सोमवार ते शुक्रवार, सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळामध्ये फोन करू शकता. या हेल्पलाईन विषयीच्या अधिक माहितीसाठी खालील लिंक वरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/helpline-abortion/

डॉक्टरांकडे न जाता गर्भपात करण्याचा विचारही करू नका आणि टेन्शन घेऊ नका. नेहमी नेहमी गर्भपात करणं स्त्रीच्या आरोग्यासाठी चांगले चांगले नाही त्यामुळे नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य ते गर्भनिरोधक वापरणे गरजेचे आहे. तसेच जोडीदाराबरोबर याविषयी चर्चा करून दोघांच्या संगनमताने कोणते गर्भनिरोधक वापरायचे हे ठरवले पाहिजे. शिवाय आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की, लैंगिक संबंधांबरोबर गर्भनिरोधनामध्येही स्त्रीप्रमाणे पुरुषाचा तितकाच सहभाग असायला पाहिजे. ‘नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी’ या वेबसाईटवरील लेखातून तुम्हाला अधिक माहिती मिळेल. खाली लिंक दिली आहे. https://letstalksexuality.com/contraception/

आपल्या वेबसाईटवर याविषयीचे अनेक प्रश्न चर्चिले आहेत ते नक्की वाचा. खाली लिंक दिली आहे.

https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 1 =