तुम्ही कशाची टेस्ट केली हे प्रश्नामध्ये लिहिलं नाही. परंतू प्रश्नाचा रोख पाहता गर्भधारणेची टेस्ट केली असावी असा अंदाज बांधून उत्तर लिहित आहे.
मासिक पाळीवर शरीरातल्या अनेक घटकांचा प्रभाव पडत असतो. जर तुम्ही आजारी असाल, काही औषधं घेत असाल, खूप प्रवास किंवा दगदग चालू असेल, तुमच्या नेहमीच्या रुटीनमध्ये अचानक बदल झाले असतील, मनावर प्रचंड ताण असेल तर त्याचा परिणाम मासिक पाळी चक्रावर होतो. अंडोत्सर्जन लांबलं तर पाळी पुढे जाऊ शकते. याव्यतिरिक्त काही कारण नसेल आणि मासिक पाळी मागे-पुढे जात असेल तर प्रत्यक्ष डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मासिक पाळी चक्राची माहिती घेण्यासाठी पुढील लेख पहा.