प्रश्नोत्तरेmazimevnimazyalingacholtevsexkaraychamantekaykavedoghachelagnzaleahet

1 उत्तर

तुम्ही लैंगिक संबंध ठेवायचे की नाहीत हा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल आणि त्या निर्णयाची जबाबदारी देखील. पण निर्णय घेत असताना खालील गोष्टींचा विचार नक्की करा.

१. कोणतेही लैंगिक संबंध ठेवत असताना परस्पर संमती, आदर आणि सुरक्षितता या गोष्टी महत्वाच्या आहेत.

२. तुमच्या दोघांचेही लग्न झाले असल्याने तुमच्या सध्याच्या नात्यावर या संबंधांचा काही परिणाम होईल का याचाही विचार करा आणि जो काही परिणाम होईल त्याला सामोरं जाण्याची तयार ठेवा.

३. दुसऱ्याच्या बायकोशी लैंगिक संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे.

४. अशाप्रकारचे संबंध उघडकीस आले तर बदनामीला सामोरं जावं लागतं. विशेषतः स्त्रियांना अधिक त्रास आणि मानहानी सहन करावी लागते.

कोणताही निर्णय दोघं मिळून घ्या आणि त्याच्या परिणामांना देखील दोघं मिळून सामोरं जा. नंतर माझा काही संबंध नाही असं म्हणून हात वर करू नका.

आपले उत्तर प्रविष्ट करा

17 + 0 =