लिंगावरील स्किन (त्वचा) मागे जाण्याची काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत. संभोग करताना लिंग हे योनी किंवा गुदद्वारातून आतमध्ये जाताना लिंगावरील स्किन मागे जाऊ शकते. यामध्ये घाबरण्याचे काही कारण नाही. हे सगळं नॉर्मल आहे. सुंता केल्यामुळे लिंगावरील(फक्त शिश्न मुडांवरची) स्किन काढून टाकली जाते. याचेही काही तोटे नाहीत. शिवाय मुलगे वयात आल्यानंतर हस्तमैथुन(मुठ मारणं) करायला सुरुवात करतात (हस्तमैथुन करणं वाईट नाही) यामुळे देखील स्किन मागे जाऊ शकते. हे देखील नॉर्मल आहे. उलटपक्षी जर स्किन मागे जात नसेल तर संभोग करताना ञास होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे विशेष काळजी करण्याचे कारण नाही. स्किन मागे जाणं किंवा असणं नॉर्मल आहे. तसेच स्किन मागे असणं आणि लग्न याचा काहीही संबंध नाही.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा