वीर्यात शुक्राणूंची संख्या कमी होणं याचा लैंगिक संभोगाशी, लैंगिक सुखाशी खूप कमी संबध आहे. मात्र वीर्यामध्ये एका विशिष्ट पातळीपेक्षा शुक्राणूंची संख्या कमी झाल्याने गर्भधारणेमध्ये (मुल होण्यासाठी) समस्या निर्माण होऊ शकते. वीर्यामध्ये शुक्राणूंची संख्या कमी होण्याची अनेक कारणे असू शकतात. जसे की, एखादी गाठ किंवा आजारामुळे वीर्योत्पादक ग्रंथी मध्ये वीर्य निर्मितीसाठी अडचणी येणे, पुरुषाच्या वीर्योत्पादक ग्रंथी पासून वीर्यवाहक नलिकेतून वीर्य वाहून नेण्यात अडचणी येणे, इ. अशा प्रकारच्या समस्यांसाठी योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घेणे, उपचार घेणे आवश्यक आहे. योग्य ते डॉक्टरच तुम्हाला योग्य ते निदान करून उपाय किंवा उपचार सुचवू शकतील.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा