mc baddal asked 8 years ago

mi mazya gf.sobat sex kela hota..tya nantar tichi mc darveli peksha veglya tarkhela mhanje velane zali ani rakt ghatt yet aahe. Mag yacha pregnent shi kahi sambhandh aahe kay??

1 उत्तर
Answer for mc baddal answered 8 years ago

मासिक पाळीमध्ये दोन महत्वाच्या क्रिया असतात. पहिली अंडोत्सर्जन आणि दुसरी मासिक पाळी येणं. यातील पहिली क्रिया गर्भधारण्या होण्यासाठी आवश्यक असते. अंडोत्सर्जन झाल्यानंतर १२ ते २४ तासाच्या आत तिथं एकही पुरुषबीज पोहोचलं नाही तर गर्भधारणा होत नाही. अंडोत्सर्जन झाल्यानंतर १२ ते १६ दिवसांनी मासिक पाळी येते. गर्भधारणा झाल्यानंतर मासिक पाळी येत नाही.

गर्भधारणा होण्यासाठी गर्भाशयात(पिशवीमध्ये) रक्ताचं एक मऊ आस्तर तयार होत असतं. जर गर्भधारणा झाली नाही तर हे अस्तर गळून पडायला लागतं. यालाच मासिक पाळी येणं असं म्हटलं जातं. मासिक पाळी कधी कधी उशिरा येवू शकते. मानसिक किंवा शारीरिक तणाव पाळी उशिरा येण्याला कारणीभूत असू शकतात.

नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य त्या गर्भनिरोधकांचा वापर करणं आवश्यक आहे. बाजारामध्ये कंडोम सहजरित्या उपल्बध आहेत.

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 16 =