प्रश्नोत्तरेCategory: Private QuestionMe ek Muslim ahe Ani maji gf Hindu ahe amhi degehi khup ek mekavar prem karato amhala lagn karayache ahe .pan ya vichara mule zop udun geli ahe ti jar nhi bhetali tar me marun jaain . Me tichyasathi khup radato plzz madat kara

1 उत्तर

अन्य धर्मीय मुलीबरोबर प्रेम संबंध असणे आणि त्याला नाते संबंधाचे रूप देणे यात समाजाकडून होणारा विरोध आणि पुरोगामी घटकांकडून मिळणारे पाठबळ या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. सरतेशेवटी तुम्हा दोघांचा निर्धार हा निर्णायक ठरतो, इतरांकडून होणार विरोध किंवा मिळणारा पाठिंबा हा कालांतराने पुसट होतो. हा निर्धार किती पक्का आहे याची कसोटी काळ घेत असतो. म्हणून आपल्या समोरच्या आव्हानांचा गडबडून न जाता विचार करा आणि आपला निर्धार किती पक्का आहे याचा मागोवा घ्या. त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की सापडेल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. विचारपूर्वक निर्णय घ्या आणि निर्णयाची जबाबदारी देखील.

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 1 =