आई, वडील, भाऊ, बहिण या रक्ताच्या नात्यामधील लैंगिक संबंध अनेक मानवी समूहात वर्ज मानले जातात. पावित्र्य, ममता अशा संकल्पना आणि ही नाती यांचा सहसंबंध अनेक संस्कृतीमध्ये दृढ असतो. शिवाय अशा नात्यांना समाजात उजळ माथ्याने स्वीकारता येत नाही. त्यांची वाच्चता त्या व्यक्तींसाठी एक कलंक घेवून येते असा समज, त्यांच्या पूर्ण आयुष्यावर परिणाम करू शकतो. या नात्यांनाही सत्तेची एक उतरंड असतेच. ज्यांच्याकडे सत्ता म्हणजे वयाने, अधिकाराने मोठी व्यक्ती अशा नात्याचा अधिकाराने छोट्या व्यक्तीचे शोषण करण्याची शक्यता असते. तेंव्हा विचार करा. कोणी कोणाशी संबंध ठेवायचे, नाही ठेवायचे, ते चांगले की वाईट याचे उत्तर आम्ही देऊ शकत नाही. याचे उत्तर तुम्हीच शोधा.
असुरक्षित लैंगिक संबंधातून गर्भधारणा, लैंगिक आजार पसरण्याची शक्यता असते.
आपल्या वेबसाईट वर तुमच्या प्रश्नाशी संबंधित लेख आणि अनेक उत्तरं दिलेली आहेत. खाली काहींची लिंक देत आहोत. तुम्ही ही शोधा आणि वाचा.
https://letstalksexuality.com/question/incest-sex-karna-changle-ka-vaet/