शरीरावरील केस जबरदस्तीने ओढून काढले किंवा निघाले तर त्या ठिकाणी जखम होण्याची शक्यता नेहमीच असते. हीच गोष्ट लिंगाच्या आजूबाजूल्या असणार्या केसांबाबतपण लागू होते. जर अशी जखम झाली असेल तर खाजऊ नका. कारण खजवल्यामुळं जखम चिघळण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी त्वचारोग तज्ञांच्या मदतीनं योग्य ते उपचार घ्या.
आता दुसर्या प्रश्नांबद्दल बोलू या. लिंगाच्या अवती भवतीचे केस काढण्यात चुकीचं असं काही नाही. मात्र केस काढतना लिंगाला किंवा वृषणांना इजा होणार नाही याची काळजी घ्या. केस काढल्याने शक्यतो काही समस्या निर्माण होत नाही. परंतू जर काही समस्या झाली तर लगेच डॉक्टरांना दाखवा.