प्रश्नोत्तरेCategory: Private Questionमासिक पाळीबद्दल

माझ्या बायकोची मासिक पाळी थांबून 10 दिवस झाले आम्ही pregancy चेक केली result पण Positive आला पण आता योनीतुन पांढरे व जरा हिरवट स्त्राव जातो ; हे कशामुळे होत आहे यावर काय उपाय? याचा pregancy वर काय परिणाम होतो का?

1 उत्तर

स्त्रीच्या योनीतून स्राव होणे याला अंगावरून पांढरे पाणी जाणे असेही म्हंटले जाते. योनीमार्गातून पांढरा स्राव जाणं हे नैसर्गिक आहे. अंगावरून जाणारा पांढरा स्राव याविषयी माहिती असेल तर हा स्राव नैसर्गिक आहे की, आजारामुळे त्यात काही बदल झाला आहे हे समजून घेता येईल. परंतू, नेहमीपेक्षा वेगळा दुर्गंधीयुक्त वास असल्यास आजाराच लक्षण समजून त्यावर उपचार केले पाहिजेत. योग्यवेळी उपचार घेतले तर यामध्ये घाबरण्यासारखे काहीही नाही. परंतू दुर्लक्ष केले तर हे इन्फेक्शन गर्भापर्यंत पोहचून गर्भाला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे वेळ वाया न घालवता लवकरात लवकर स्त्रीरोगतज्ञांना भेटा.

याविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/category/sexual-health/

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 20 =