भारतीय कायद्यानुसार वय वर्षे १८ च्या खालील मुलांशी कोणीही लैंगिक संबंध तयार करणे गुन्हा आहे. १८ च्या खाली त्या मुलांची संमती कायद्याने गृहीत धरली जात नाही. तुम्ही कायद्याने सज्ञान आहात का? १८ च्या पुढील व्यक्ती या प्रौढ समजल्या जातात आणि ते संमतीने, इच्छेने लैंगिक संबंध ठेवू शकतात. आता यावरून तुम्हीच ठरवा. आयुष्यातील इतर गोष्टींप्रमाणेच अभ्यास, परीक्षा, करिअर या गोष्टीही तितक्याच महत्वाच्या आहेत. यावर लक्ष केंद्रित करणेही खूप आवश्यक असते. जबाबदाऱ्या पेलण्याची क्षमता, परिणामांची जाणीव याचा विचार तुम्ही दोघान्हीही केलाय का? दोघांच्याही दृष्टीने काय योग्य आहे हे तुम्ही दोघे मिळून ठरवा आणि योग्य निर्णय घ्या.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा