mi 22 years old purush asun mazi chati jast aahe and chest fit nahi, Tyvar upay sangun doctor refer kra
समाजातील अनेक प्रचलित गैरसमजांना आपण सहज बळी पडतो. आपण जसे आहोत तसं स्वतःला स्विकारण्यामध्ये गैर काहीच नाही. शरीराच्या कोणत्या अवयवाचा किती आकार असावा यात अनुवांशिक जनुकांचा भागदेखील महत्वाचा असतो. तुम्ही विचारलेला प्रश्न स्तनांबाबत आहे. शरीरातील हार्मोन्सच्या बदलामुळं पुरुषांच्या शरीरातील स्तनांचा आकार कमी जास्त असू शकतो. यात चिंता करण्याचं फारसं कारण नाही. मात्र तरीही तुम्हाला डॉक्टरांना भेटायचं असेल तर जनरल फिजिशियनला सुरुवातीला भेटलात तर ते योग्य निदान करुन पुढील डॉक्टरांकडे पाठवू शकतील.
प्रिय वाचक मित्र मैत्रिणींनो,
आजपर्यंत आपण वेबसाईटच्या माध्यमातून संवाद साधला. आता ‘लेट्स सोच- एक नया नजरिया’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला प्रत्यक्ष भेटता येईल. आपणा सर्वांना या कार्यक्रमाचं आग्रहाचं निमंत्रण. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा https://letstalksexuality.com/lets-soch-ek-naya-nazaria/