प्रश्नोत्तरेCategory: Private Questionmi eka vivahit mahileshi nirodh n vaprta. sex kela tr aamhala kahi dhoka aahe ka

1 उत्तर

ज्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध आलेत किंवा येणार आहेत त्या व्यक्तीला जर एच. आय. व्ही./ एड्सची लागण झालेली नसेल तर संसर्ग होत नाही. परंतु जर त्या व्यक्तीला एच. आय. व्ही./ एड्स आहे अशा एकाजरी व्यक्तीसोबत असुरक्षित लैंगिक संबध आला तर एच. आय. व्ही होण्याचा धोका वाढतो. एखाद्या व्यक्तीकडे पाहून ती एच. आय. व्ही बाधित आहे कि नाही हे सांगता येत नाही. समोरच्या व्यक्तीला एच. आय. व्ही./ एड्स आहे की नाही हे ओळखण्याचा एच. आय. व्ही. टेस्ट व्यतिरिक्त इतर कोणताही मार्ग नाही. म्हणूनच जास्त व्यक्तींशी असुरक्षित लैंगिक संबध ठेवले तर लैंगिक संबंधातून पसरणारे आजार पसरण्याची शक्यता असते. म्हणूनच सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे कधीही चांगले.

एचआयव्हीची लागण होण्याचे बिगर लैंगिक मार्ग म्हणजे-

• निर्जंतुक न केलेल्या इंजेकशनच्या सुया,

• दूषित रक्त आणि

• प्रसूतीच्या वेळी आईकडून बाळाला एचआयव्हीची लागण होऊ शकते.

एच. आय. व्ही./ एड्सची सविस्तर माहिती खालील लिंकवर दिली आहे.

https://letstalksexuality.com/hiv_aids/

तुमचा प्रश्न “मी ‘एक्स’ व्यक्तीशी संबंध ठेवला तर एड्स होईल का ? ” एवढ्यापुरता मर्यादित नसून त्याला अनेक भावनिक आणि सामाजिक पैलू आहेत त्याचा तुम्ही विचार करावा असे वाटते.

१.उघड आहे तुमचे हे संबंध तुम्ही जगासमोर स्वीकारण्याच्या स्थितीत नसणार आहात. ते लपवावे लागतील. कारण आपल्या समाजात ते स्वीकारले जाण्याची शक्यता नाही. असे संबध जर उघडकीस आले तर त्यातून तयार होणाऱ्या अडचणींना/ गुंतागुंतीला सामोरं जाण्याची तुमची तयारी आहे का? त्यावेळी दोघांची एकमेकांना साथ असेल का? कारण बहुतेक वेळेस पुरुषासाठी हे सोपं असू शकतं, बाईसाठी नाही…

२. या लैंगिक संबंधांमुळे तुमच्या मैत्रिणीच्या वैवाहिक नात्यामध्ये गुंतागुंत वाढू शकते.

३. दुसऱ्याच्या बायकोसोबत लैंगिक संबध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे.

निर्णय काहीही घ्या पण त्याच्या परिणामांची जाणीव ठेवा आणि जबाबदारीही घ्या. त्यापासून पळून जाऊ नका किंवा माझा काही संबंध नाही असं नंतर म्हणू नका.

आपले उत्तर प्रविष्ट करा

5 + 11 =