यासाठी त्यांच पाळीचक्र किती दिवसांचं आहे हे तुम्हाला माहित हवं. गर्भधारणा होण्यासाठी स्त्रीबीज बीजनलिकेत असणं महत्वाचं आहे. एका पाळीचक्रात एकच(कधीतरी दोन स्त्रीबीज एकाचवेळी परिपक्व होतात) स्त्रीबीज परिपक्व होतं आणि पाळी येण्याच्या १२ ते १६ दिवस आगोदर बीजनलिकेत येतं. पाळीचक्र जर नियमित असेल तर अंडोत्सर्जनाच्या कालावधीचा अंदाज बांधणं सोप्प जातं. ज्या वेळी अंडोत्सर्जन होतं त्यानंतर साधारण १२ ते २४ तास ते जिवंत राहतं. जर याच काळात संभोग होऊन शुक्राणूशी मिलन झालं तर गर्भधारणा होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला गर्भधारणेची शक्यता वाटत असेल तर बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या प्रेगनन्सी कीटचा वापर करुन तपासणी घरच्या घरी करता येईल.
अनेकवेळा आजारपण, मानसिक ताण तणाव यामुळं पाळी चक्र मागे पुढे जाऊ शकतं. यात चिंता करण्याचं कारण नाही. हे मात्र नक्की लक्षात ठेवा, नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य त्या गर्भनिरोधकांचा वापर करणं गरजेचं आहे. कंडोम बाजारामध्ये अगदी सहज उपलब्ध असतात. अनेकवेळा नको असलेली गर्भधारणा झालीच तर त्याचे मानसिक आणि शारोरिक नुकसान त्या मुलीलाच सहन करावे लागतात. त्यामुळं एका जबाबदार माणूस म्हणून तुम्हीसुध्दा ही काळजी घ्या आणि योग्य त्या गर्भनिरोधकांचा वापर करा.