प्रश्नोत्तरेCategory: Private Questionmi mulich sil todla bina condom cha. sil todlyane aaplyala kahi hot ka?

2 उत्तर

पहिल्यांदा तुमच्या प्रश्नामध्ये तुम्ही वापरलेल्या ‘सील तोडणे’ याविषयी बोलूयात. स्त्रीच्या योनीमार्गात हायमेन नावाचा लवचिक पडदा असतो. तो फाटला असेल तर ती मुलगी कुमारी किंवा व्हर्जिन नाही असा चुकीचा समज आहे. हा पडदा सेक्सशिवाय इतरही शारीरिक हालचाली – जसं पोहणं, सायकल चालवणं, खेळ यामुळे फाटू शकतो. त्यामुळे हायमेन फाटणे म्हणजे सेक्स हे गृहितकच चुकीचं आहे.

तुमचे म्हणणे आहे तुम्ही कंडोम न वापरता लैंगिक संबंध ठेवले. असे संबंध असुरक्षित लैंगिक संबंध आहेत कारण १. यामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता असते. २. लैंगिक संबंधांमुळे पसरणारे आजार पसरण्याची शक्यता असते.

सर्वात महत्वाचे म्हणजे कोणत्याही लैंगिक संबंधांमध्ये दोन्ही जोडीदारांची संमती असणे आवश्यक आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 5 =