mukh maithun asked 7 years ago

mukha maithun va gud maithun karne changle ahe ka

1 उत्तर
Answer for mukhmaithun answered 7 years ago

मुखमैथुन किंवा गुदामैथुन करण्यामध्ये गैर काही नाही. मात्र या गोष्टीं दोघांच्याही संमंतीनं होणं आवश्यक आहे. अनेकवेळा पुरुष पॉर्नक्लिपमधील नकली दृष्य पाहून जोडीदारालाही अशा गोष्टी करायला सांगतात. त्यामुळं जोडीदाराला तुमच्याविषयी अनादर वाटू शकतो. यापेक्षा जोडीदाराशी लैंगिक क्रियेबद्दलचा मोकळा संवाद सुरु करा. ज्यावेळी जोडीदाराला अशा गोष्टी करणं सुखकारक वाटेल त्याचवेळी करा. गुदामैथुन करताना नेहमी लक्षात ठेवा, गुदद्वार योनीसारखे लवचिक नसते. त्यामुळं गुदामैथुन करताना दोघानांही जास्त त्रास होवू शकतो. यासाठी चांगल्याप्रकारची वंगणं वापरणं फायदेशीर ठरतं. थुंकीदेखील एक प्रकारचं वंगण आहे. एचआयव्हीचा धोका नसला तरी इतर लिंगसांसर्गिक आजारांपासून बचाव करण्यासाठी कंडोमचा वापर योग्य राहतो.

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 18 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी