मूल न होण्याच्या ऑपरेशना नसबंदी करणं म्हणतात. नसबंदीची शस्त्रक्रिया स्त्री किंवा पुरुष अशी कोणाचीही करता येते. तुलनेने पुरुष नसबंदी सोप्पी असते. तुमच्या प्रश्नामधून नसबंदीचं ऑपरेशन स्त्रीचं झालं आहे की पुरुषाचं हे कळत नाही. शिवाय कितव्या वर्षी नसबंदीचं ऑपरेशन झालं हे देखील कळत नाहीये.
एकदा केलेली नसबंदी उलटी करणं शक्य असतं. याला इंग्रजीमध्ये रिव्हर्सल ऑफ व्हॅसेक्टोमी, ट्युबेक्टोमी असं म्हणतात. नसबंदी उलटी करण्याची शस्त्रक्रिया करता येते पण ही शस्त्रक्रिया जास्त अवघड व जास्त खर्चिक असते. अशा शस्त्रक्रियेला यश येईल की नाही हे सांगता येत नाही. यासाठी प्रत्यक्ष डॉक्टरांना भेटून त्यांच्या सल्ला घ्या.