प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsmula peksha mulila jast kand asto ka karan kahi muli kiti zaval tari miti martat

1 उत्तर

मिठी मारण्यावरून समोरच्या व्यक्तीला लैंगिक इच्छा जास्त आहे असा समज करून घेणे योग्य आहे का? मिठी मारणे ही कृती लैंगिक अभिव्यक्ती सोबतच प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्याशी संबधित सेखील असू शकते हे तुला मान्य आहे का? प्रत्येक कृतीकडे आपण जर लैंगिक अर्थानेच बघत असू तर त्यावर जरा विचार करायला हवा.

स्त्रियांची लैंगिक इच्छा पुरुषांपेक्षा कमी असते की अधिक ? या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाल्यास, स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त किंवा कमी लैंगिक इच्छा असते असे सरसकट विधान करता येणार नाही. प्रत्येक व्यक्तीनिशी मग ती स्त्री असो वा पुरुष वेगवेगळी कमी अथवा अधिक असू शकते. स्त्रियांची लैंगिक इच्छा पुरुषांपेक्षा कमी किंवा जास्त असते असे म्हणण्याऐवजी ती वेगळ्या प्रकारची असते, असे म्हणणे अधिक बरोबर होईल. अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाच.

https://letstalksexuality.com/sexual-desire-male-female-difference/

तुझ्या प्रश्नातील भाषेविषयी थोडंसं बोलू यात. असे कंड सारखे शब्द सहसा शिव्यांमध्ये येतात आणि म्हणून त्यात एक नकारात्मकता येते. काहींना पर्यायी शब्द माहित नसतात हे आम्ही समजू शकतो. पण मुद्दामहून जर कोणी असे शब्द असेल तर मात्र पर्यायी शब्द शिकून घ्यायला पाहिजे आणि त्याची सवय करायला पाहिजे. प्रत्यक्ष संबंधांमध्ये ज्या स्त्रीशी संबंध करशील तेव्हा तिच्याविषयी तिच्या शरीराविषयी आदरच असायला पाहिजे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 20 =