प्रश्नोत्तरेMulichi aplya barobar sex karanyachi ichchha ahe ki nahi te kase olakhave?

1 उत्तर

समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे हे कळण्याचं खास असं काही विज्ञान अस्तित्वात नाही. ज्यांना तसं कळतं, असं ते स्वतः म्हणतात, त्यांना ते अनुभवाअंती समजत असावं. पण असे काही ठोकताळे सांगावे म्हटले तरी ते सांगणं अतिशयोक्ती ठरावी.
पण आशा आहे तुम्ही एका अशा नात्याबद्दल बोलत आहात ज्यात एकमेकांबद्दल ओळख, विश्वास, आदर आहे. अशा मुलीविषयी बोलत आहात जी तुमची मैत्रीण, जिवलग, प्रेयसी अथवा जोडीदार आहे. कारण शरीर संबंध किंवा शारीरिक जवळीक हा अशा प्रकारच्या नात्याचा एक अविष्कार असतो, अनेक पैलूपैकी एक पैलू असतो असं म्हणता येईल. आणि या नात्यात ज्या प्रमाणे आपलं प्रेम व्यक्त केलं जातं, जवळीक ओळखली जाते, विश्वास दिला जातो त्याचप्रमाणे शरीर संबंधांची ओढही व्यक्त केली जाते, समजून घेतली जाते आणि तसा प्रतिसाद दिला जातो. हा प्रतिसाद नजरेत दिसू शकतो, स्पर्शात ओळखता येतो. आणखी एक मार्ग नक्कीच सांगता येईल तो म्हणजे ‘बोलणे’. आपल्या मनातील भाव शब्दातून व्यक्त करा, बोला आणि ती स्पेस, तो अवकाश आपल्या जोडीदारालाही आहे हे मान्य करा, तसा विश्वास द्या. 
आवाहन
तुमच्या प्रश्नाबद्दल धन्यवाद. प्रश्नाला मिळालेल्या उत्तराने काही प्रमाणात तरी तुमचे शंका निरसन झाले असावे अशी आशा आहे. मानवी लैंगिकतेचे अनेकानेक पैलू समजून घेता यावे आणि लैंगिकतेशी संबंधित कुठल्याही शंकेला अथवा प्रश्नाला व्यक्त करता यावं, प्रश्नांना वैज्ञानिक आणि संवेदनशील उत्तरं मिळावीत याच उद्देशाने ही वेबसाईट आम्ही चालू केली आहे. एका वर्षातच आपल्या या वेबसाईटला २ लाखापेक्षा अधिक ‘हिट्स’ मिळाल्या आहेत. शिवाय आपल्या ‘प्रशउत्तरे’ या मंचावर रोज दोन ते तीन प्रश्न विचारले जातात. प्रश्नकर्त्याविषयीची गोपनीयता हे एक महत्वाचे वैशिष्ट्य आपली वेबसाईट लोकप्रिय असण्या मागचे प्रमुख कारण आहे.  
 
तुम्हाला आमचा प्रयत्न उपयोगी वाटतो का? तुम्ही या वेबसाईटबद्दल इतरांना सांगाल का? ही वेबसाईट आणखी चांगली कशी करता येईल? काय नाही आवडलं? या आणि अशा मुद्यांवर तुम्हाला आमच्याशी बोलायला आवडेल का? प्लीज तुम्ही आम्हाला लिहून कळवा किंवा मोबाईलचा वापर करून आपलं मत ऑडिओ किंवा व्हिडीओ रुपात रेकॉर्ड करून आम्हाला पाठवू शकता. तुमची ओळख गोपनीय राखली जाईल ही खात्री बाळगा. आपले बहुमूल्य मत आम्हाला tathapi@gmail.com या ई मेल जरूर पाठवा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 2 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी