सर्वप्रथम आपण हे लक्षात घ्यायला हवे की, प्रेम ही दोन व्यक्तींच्या संमतीने होणारी गोष्ट असायला हवी. तुमचं एखाद्या मुलीवर खरंच प्रेम असेल तर तिच्यापाशी ते जरूर व्यक्त करा. पण फक्त तुम्हाला एकट्याला वाटते म्हणून एखाद्या मुलीला तिच्या इच्छेविरुद्ध जाऊन पटवणं किंवा तिला प्रेमात पडायला भाग पाडणं हे मात्र योग्य नाही. आपण हे समजून घेतले पाहिजे की, मुलगी ही स्वतंत्र व्यक्तिमत्व, विचार असणारी ‘माणूस’ आहे. मशीन किंवा कृत्रिम वस्तू नव्हे. म्हणूनच ‘मुलगी पटवणे’ ही काही बाईक चालवणे, लिहायला वाचायला शिकणे, कम्प्युटर शिकणे यांसारखी कौशल्ये शिकण्याची बाब नाही. वाढत्या वयात, तरुणपणी आणि खरंतर वयाच्या कोणत्याही टप्प्यात आपल्या कोणीतरी सोबतीला असावं असं वाटणं स्वाभाविक आहे. तुम्हाला खरंच कोणी आवडत असेल तर तुमचे प्रेम जरूर व्यक्त करा. ते व्यक्त करताना समोरच्या व्यक्तीचा आदर, प्रतिष्ठा आणि स्वतंत्र अस्तित्व याचा तुम्ही विचार करालच. मात्र, माझे मित्र म्हणतात म्हणून, माझ्या सर्व मित्रांना गर्लफ्रेंड आहे म्हणून किंवा इतर कोणत्याही दबावाखाली येऊन जोडीदार शोधू नका.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा