प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsलैगिक प्रश्न

माझे वय 22 आहे

मला जसे समजते तसे लहान पण पासून

माझे 1 वृषण लहान व 1 मोठे आहे

व लिंगावरची कातडी माघे सरकत नाही

मा पॉर्न पाहतो व हस्तमैथुन पण करतो

मला आता तरी काही त्रास नाही

परंतु लग्न नंतर काही त्रास होईल काय

करुपया मार्गदर्शन करा।

1 उत्तर

१. दोन्ही वृषणांचा आकार एक समान नसतो. त्यामध्ये थोडाफार फरक असतो. परंतू दोन्ही वृषणांच्या आकारामध्ये खूप जास्त फरक असेल तर अशावेळी डॉक्टरांचा सल्ला फायदेशीर राहिल.

२. संभोग करताना किंवा हस्तमैथुन करताना लिंगावरची त्वचा मागे न जाता काहीही त्रास होत नसेल तर चिंता करण्याचं कारण नाही. परंतू जर संभोग करताना किंवा हस्तमैथुन करताना त्वचा मागे न गेल्यामुळं त्रास होत असेल तर अशावेळी ती त्वचा काढून टाकता येते. याला सुंता करणं असं देखील म्हटलं जातं. मात्र अशी त्वचा काढून टाकण्य़ासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

३. पॉर्न क्लिप पाहणं चांगलं की वाईट हे प्रत्येकानं ठरवण्याची गरज आहे. कारण पॉर्न क्लिप्समधील अनेक गोष्टी या अवास्तव किंवा अतिरंजित कल्पना असतात. अनेकावेळा जोडीदाराची इच्छा नसताना पॉर्न क्लिपमध्ये दाखवलेल्या गोष्टी करण्यास भाग पाडलं जातं. हे चुकीचं आहे. अनेकजणांना पॉर्न क्लिपमधील दाखवलेले लैंगिक अवयवांचे आकार हे स्टॅण्डर्ड वाटू लागतात. आणि मग आपल्या लैंगिक अवयांचे आकार तसे करण्याची अयशस्वी धडपड चालू होते. काहींना आपल्याच अवयवांची लाज वाटू शकते. त्यामुळं पॉर्न क्लिप पाहणं किंवा न पाहणं ह स्वतः ठरवण्याची गोष्ट आहे.

४. हस्तमैथुन करण्यामध्ये काहीही गैर नाही. हस्तमैथुनाचे शरीरावर कोणतेही वाईट परिणाम होत नाहीत. मात्र सतत मनामध्ये सेक्सबद्दल विचार येत असतील आणि हस्तमैथुन केलं जात असेल ज्यामूळं तुमच्या दैनंदिन कामावार परिणाम होत असेल तर ते टाळा. अन्यथा हस्तमैथुन करण्यामध्ये चुकीचं असं काही नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 3 =