New things to try asked 8 years ago

Me 24 varshancha ahe. Sarvapratham mala hya sites la manapasun thanks mhanaychay karan ithe mala upyukt mahiti milate ani me mala aslele prashna moklepanane vicharu shakto.
Me gelya kahi varshanpasun athavdyatun 3-4 vela hastamaithun karto.
Pan ata tyat toch toch pana janavu lagla ahe ani navinya kahi rahila nahiye. So tyat navinya ananyasathi kahi karta yeil ka? Jashi sambhogachi vegvegli positions astat tasa kahi try karta yeil ka?
Ani mala hastamaithun karun zalyavar guilt feeling yete hya var kahi upay?

1 उत्तर
Answer for New things to try answered 8 years ago

तुम्हाला साइटचा उपयोग होतो हे वाचून छान वाटलं. तुमच्यासारख्या सगळ्यांनाच ही साइट उपयोगी व्हावी, आवडावी आणि त्यावर तुम्ही तुमचे विचार मांडावेत हाच आमचा उद्देश आहे.
आता वळू या तुमच्या प्रश्नाकडे –
हस्तमैथुन ही मनाला आणि शरीराला आनंद देणारी निर्धोक कृती आहे. तिचे शरीरावर, मनावर कसलेही विपरित परिणाम होत नाहीत. अतिरेक न केल्यास लैंगिक आरोग्यावर, लिंगाच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होत नाही. त्यामुळे त्याबाबत अपराधी वाटून घेण्याचं काही कारण नाही.
कोणतीही गोष्ट जेव्हा अति वेळा केली जाते तेव्हा त्यात तोचतोचपणा येतो. नाविन्य आणण्यासाठी तुम्हाला कशातून आनंद मिळतो हे समजून घेणं गरजेचं आहे आणि ते सगळ्यात जास्त तुम्हीच चांगलं ओळखता. तरी काही गोष्टी सुचवीत आहोत.

  • केलंच पाहिजे म्हणून हस्तमैथुन करणं टाळा. त्यातून आनंद मिळत नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही.
  • हस्तमैथुन केलं नाही तर करमत नाही, दुसऱ्या गोष्टीत लक्ष लागत नाही अशी स्थिती होत असेल तर सावध व्हा. कोणत्याही कृतीत तोचतोचपणा येऊ लागला की तिच्यातून मिळणारा आनंद कमी होतो. त्यामुळे काही दिवस हस्तमैथुन करू नका.
  • सेक्सच्या विविध पोझिशन्स असतात तशा हस्तमैथुनाच्या आहेत का असं तुम्ही विचारलं आहेत. खरं तर हस्तमैथुन एकट्याने करायचं असल्याने तुम्ही तुमची कल्पनाशक्ती कामाला लावा. विविध प्रसंग, जागांबद्दल विचार करून तुम्ही त्यात नाविन्य आणू शकता. भारतामध्ये सेक्स टॉइज मिळत नाहीत. नाही तर लैंगिक आनंद मिळवण्यासाठी त्यांचाही वापर करता येऊ शकतो.
  • एक मात्र नक्की, आनंद मिळत नसेल तर हस्तमैथुनाच्या मागे लागू नका. ते जीवनावश्यक नाही. एखादी गोष्ट कंटाळवाणी झाली तर ती करणं थांबवावं इतकं हे सरळ साधं आहे.

आमच्या उत्तराने तुमची निराशा होणार नाही अशी आशा आहे. लिहीत रहा…

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 2 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी