प्रश्नोत्तरेCategory: Private Questionpahila sex kartana mulichya yonit aag hote tari sex kela tar chalto ka ?

sex kartana mulichya yonit aag hote ,tya mule amhala pudhe kahi karta yet nahi tyamule maze linga tichya yonit purna jat nahi kiva ti te jau det nahi mi kay karave plz mala sangave v he gupit thevave hi vananti.

maza e-mail id-amit.badade9673@gmail.com

Mobile No-8856034920

1 उत्तर

सेक्स हा दोघांसाठीही तितकाच आनंददायी असला पाहिजे म्हणूनच सेक्सच्या वेळी जोडीदाराला वेदना होत असतील तर तो त्या वेळी थांबवणे योग्य. वेदनेमागचे कारण समजून घेऊन त्यावर उपायही शोधणे गरजेचे आहे. फक्त संभोग करतानाच योनीमध्ये आग होते की इतरवेळीही होत असते? यामागे दोन-तीन कारणे असू शकतात. सेक्सविषयीची भीती, शरीरसंबंधांच्या वेळी योनीमध्ये पुरेसा ओलसरपणा तयार न झाल्याने आग होत आहे किंवा योनीमार्गाला जंतुसंसर्ग झाला आहे. याविषयी थोडक्यात समजून घेऊयात.

१. सेक्सविषयीची भीती

आपल्या समाजामध्ये सेक्सविषयी मोकळेपणाने बोलले जात नाही त्यामुळे अनेक गैरसमज पसरतात. त्यातीलच हा एक. चुकीची माहिती मिळाल्याने, ‘सेक्स म्हणजे वेदना’ असे समीकरण अनेक मुलींच्या मनामध्ये तयार होते. सेक्सविषयी मनात असलेली भीती, संकोच आणि लाज यामुळे मुली संभोगावेळी पाय आखडून घेतात, भीतीपोटी योनीचे स्नायू आकुंचित झालेले असतात. पहिला संभोग म्हणजे ‘आनंदाची परिसीमा’ असेही नसते किंवा ‘पहिला संभोग म्हणजे वेदना’ असेही नसते. जोडीदारांना आपापल्या आणि एकमेकांच्या शरीराविषयी माहिती असेल तसेच दोन्ही जोडीदारांनी एकमेकांना प्रेमाने आणि स्पर्शाने उत्तेजित केले तर पहिल्या संभोगात अजिबात वेदना होत नाहीत.

२. योनीमार्गाला होणारा जंतूसंसर्ग-

योनीमार्गाला वेगवेगळ्या जंतूंमुळे संसर्ग होऊ शकतो. योनमार्गात खाज येणे, आग होणे, अंगावरून जास्त जाणे, अंगावरून जाणाऱ्या म्हणजेच योनीमार्गातून येणाऱ्या स्रावाचा रंग, वास बदलणं, त्या स्रावाचं प्रमाण वाढणे, कंबर दुखणे, ओटीपोटात दुखणे अशा अनेक प्रकारे आपल्याला योनीमार्गात जंतुसंसर्ग झाल्याची जाणीव होते. योनीमार्गातील जंतुसंसर्ग केवळ लैंगिक संबंधांमधून होत नाहीत. अंगावरून जाणं, पांढरं जाणं, पांढरा प्रदर, श्वेत प्रदर किंवा व्हाइट डिस्चार्ज अशी अनेक नावं या संसर्गांना किंवा इन्फेक्शन्सना आहेत.

योनीमार्गाला होणाऱ्या काही संसर्गांची माहिती पुढे दिली आहे.

https://letstalksexuality.com/reproductive-tract-infections/

३. योनीमध्ये तयार होणारा ओलावा/ योनिस्राव

लैंगिक संबंधाच्या वेळेस योनीमध्ये ओलसरपणा वाढतो म्हणजे नक्की काय होते, हे समजून घेऊयात. स्त्रिला लैंगिक इच्छा झाली आणि लैंगिक उत्तेजना मिळाली की, योनीमध्ये रक्तप्रवाह वाढतो आणि योनीच्या आतील स्राव वाढून योनीतील ओलावा वाढतो. स्त्रीच्या मनात सेक्स करण्याची इच्छा नसेल किंवा उत्तेजना मिळाली नसेल तर योनीमध्ये ओलसरपणा तयार होणार नाही. म्हणूनच लैंगिक संबध करत असताना संमती आणि इच्छा खूप महत्वाची आहे.

योनीमध्ये तयार होणारा ओलावा/ योनिस्राव संबंधांच्या वेळी वंगण(लुब्रींकंट) म्हणून काम करत असतो. तो कमी झाल्याने शरीरसंबंध करताना योनीमध्ये आग होऊ शकते किंवा त्रास होऊ शकतो. प्रत्यक्ष संभोगापूर्वी कामक्रीडा (फोरप्ले) करणं योनीमध्ये ओलावा तयार होण्यामध्ये फायदेशीर ठरतं. योनीतील ओलसरपणा वाढविण्यासाठी काहीजण कृत्रिम वंगण(लुब्रींकंट)/जेली चा वापर करतात. तुमच्या जोडीदाराशी याविषयी बोला.

योनिमधील ओलावा कमी होण्यामागे आणखी एक कारण म्हणजे मेनोपॉज. वयाच्या 45-50 च्या आसपास कधी कधी त्याहीनंतर स्त्रीचं पाळीचक्र थांबतं याला मेनोपॉज असं म्हणतात. ही बाईच्या शरीरात होणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मेनोपॉजच्या काळात आणि त्यानंतर स्त्रीमध्ये काही शारीरिक आणि भावनिक बदल होत असतात. लैंगिक इच्छा आणि भावभावनाही बदलू शकतात. योनीतील ओलसरपणा आणि लवचिकपणा कमी होणं हा एक होणाऱ्या बदलांपैकी एक बदल आहे. मेनोपॉजविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा. https://letstalksexuality.com/menopause/

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 8 =