पहिल्यांदा सेक्स केल्याने शरीरात काही विशेष, जाणवण्याइतपत किंवा दिसून येणारा बदल घडत नाही. पहिल्यांदा सेक्स केल्यावर रक्त येते का? योनिमार्गातील पडदा फाटतो का? असे प्रश्न अनेकांच्या मनात असतात. पण यामध्ये काही तथ्य आणि काही गैरसमज आहेत. मुलींच्या योनीमार्गात एक लवचिक पडदा असतो, ज्याला हायमेन असं म्हणतात. पहिल्या सेक्सच्या वेळी लिंग योनीत गेल्याने हा पडदा विलग होतो आणि कधी कधी त्यातून रक्त येतं. ज्यामुळे दुखून थोडा रक्तस्त्राव होऊ शकतो. पण जरुरी नाही की हा पडदा पहिल्या लैंगिक संबंधांच्या वेळीच फाटेल. सायकल चालवणे, पळणे किंवा पोहणे अशा कृतीमुळेही हे अस्तर फाटू शकते..
थोडक्यात काय तर एखाद्या व्यक्तीने सेक्स केला आहे कि नाही हे ओळखण्याचा शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेला एकही मार्ग अस्तित्वात नाही.
याविषयीचे काही प्रश्न वेबसाईटवर चर्चिले आहेत त्यातील दोन प्रश्न तुमच्या माहितीसाठी देत आहे.
https://letstalksexuality.com/question/first-time-sex-kelyavar-blood-yetech-ka/
https://letstalksexuality.com/question/blood-ka-yate-first-sex-kelavr/