प्रश्नोत्तरेpahilynda sex kartana kay karave? konati kalaji ghyavi.

1 उत्तर

आयुष्यातील पहिला वहिला सेक्स करताना सर्वप्रथम दोन्ही जोडीदारांची तयारी आहे ना हे पहायला पाहिजे. सेक्स करण्याची इच्छा आहे ना, संमती आहे ना आणि दोघांनाही तेवढीच ओढ आहे ना याचा विचार व्हायला पाहिजे.सेक्स म्हणजे फक्त संभोग किंवा इंटरकोर्स नाही. त्याआधी एकमेकांना सुखावेल अशा पद्धतीने जवळीक साधणं आणि एकमेकांना छान वाटेल अशा पद्धतीने संवाद साधणं आवश्यक आहे. याला प्रणय किंवा फोअरप्ले म्हणतात. संभोगाची घाई सेक्समधील आनंद कमी करू शकते. आणि पहिल्यांदा सेक्स करताना सगळ्या गोष्टी तुम्हाला किंवा तुमच्या जोडीदाराला जमायलाच पाहिजेत असा आग्रह धर नका. तुम्हाला आनंद मिळणं आणि छान वाटणं जास्त महत्त्वाचं आहे. पहिल्यांदाच सेक्स करत असाल तर प्रभावी गर्भनिरोधक वापरणं कधीही चांगलं. निरोध किंवा कंडोमचा वापर करा आणि गर्भधारणा किंवा लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या आजारांची भीती मनातून काढून टाका.

आपले उत्तर प्रविष्ट करा

17 + 16 =