हस्तमैथुन करताना लिंग आणि आजूबाजूचे स्नायू ताठर झालेले असतात. हस्तमैथुनानंतर जेव्हा ऑरगॅझमचा अनुभव येतो (लैंगिक सुख मिळतं) तेव्हा हे ताठर झालेले स्नायू सैलावतात. यामध्ये वैदना निर्माण होण्याचं खरं तर काही कारण नाही. स्नायू सैलावत असताना थोडा ताण येऊ शकतो. ती भावना तुम्हाला वेदना वाटत असावी. या संपूर्ण क्रियेत जर खूप जोर लावला जात असेल तर कधी कधी स्नायू दुखावू शकतात. अशा प्रकारे तुम्ही काही करत असाल तर ते टाळा.
हस्तमैथुनाबाबत आपल्या मनात थोडीफार नकारात्मक भावना असेल तर वेदना होणे, थकवा येणे, हस्तमैथुनानंतर अपराधी वाटणे अशा भावना मनात येऊ शकतात. आपल्या समाजात हस्तमैथुन करण्याविषयी अनेक गैरसमज आहेत. त्याचा परिणाम म्हणून या भावना मनामध्ये येऊ शकतात. मात्र हस्तमैथुन करणं म्हणजे काही पाप किंवा वाईट नाही. स्वतःच्या शरीराला, लैंगिक अवयवांना इजा होणार नाही, स्वच्छता राखली जाईल अशा पद्धतीने हस्तमैथुन केल्यास त्रास होणार नाही.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा