वीर्य सख्खलनाच्या वेळी तुम्ही जरी लिंग बाहेर काढले असले आणि योनीमार्गाभोवती वीर्य पडले तर त्यातील एखादेही पुरूषबीज गर्भधारणेस पूरक असू शकते. लैंगिक संबंधानंतर मासिक पाळी चुकली आहे तसेच गर्भधारनेविषयी मनामध्ये शंका निर्माण झाली आहे लवकरात लवकर प्रेग्नंसी किटच्या सहाय्याने टेस्ट करून खात्री करून घेणे योग्य राहील. गर्भधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जर गर्भधारणा झाली असेल आणि ती नको असेल तर गर्भपातासाठी कोणतेही घरगुती उपाय न करता योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. भारतात काही परिस्थितीत 20 आठवड्यांपर्यंतचा गर्भपात कायद्याने मान्य आहे.
नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी व सुरक्षित लैंगिक संबंधांसाठी कंडोमचा वापर हा एक सुरक्षित पर्याय आहे.