pali nanatar hi blooding hote asked 6 years ago

mi sex kela hota tichya pali chya 4-5 days nantar mag tila mi i pill 48 hours nanatar dili..i pill dilya chya nantar 3 days pasun 4 divas jhale blooding hotay ..mag ti preganat ahe ka ?? ticha masik pali nanatar 4-5 divasani bina condom sex kela hota ..mala khup bhiti vatate

1 उत्तर

लैंगिक संबंधानंतर मासिक पाळी चुकणे हे गर्भधारणा झाल्याचे एक लक्षण आहे. गर्भनिरोधक गोळ्या हे इमर्जन्सी गर्भनिरोधक म्हणून वापरण्याचे साधन आहे. परंतू आजची तरुणाई या गोळ्यांचा सर्रासपणे वापर करत आहे. या गोळ्यांचा मुलींच्या/स्त्रियांच्या शरीरावर नकारात्मक परिणाम होत असतो. त्यामुळे नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी आणि सुरक्षित लैंगिक संबंधांसाठी कंडोमचा वापर हा एक सुरक्षित पर्याय आहे.

पाळी चक्रात गर्भधारण कोणत्या काळात होऊ शकते? गर्भधारणेसाठी स्त्री बीज बीजनलिकेत असणं आणि पुरुष बीज तिथपर्यंत जाऊन त्यांचा संयोग होणं आवश्यक असतं. पुढची पाळी येण्याच्या साधारण 12-16 दिवस आधी अंडोत्सर्जन होतं. बीजनलिकेत स्त्री बीज 12 ते 24 तास जिवंत राहतं. या काळात गर्भ धारणा होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. मात्र हा काळ नेमकेपणाने सांगता येईलच असं नाही. तसंच पुरुषबीजं स्त्रीच्या योनिमार्गात 3 ते 5 दिवस जिवंत राहू शकतात. म्हणून अंडोत्सर्जनाच्या आधी 4 दिवस आणि नंतर 2 दिवस हा काळ जननक्षम मानला जातो. या काळात गर्भधारणा होऊ शकते.

मासिक पाळीनंतरही रक्तस्राव होत असेल तर कृपया डॉक्टरांना भेटा

आपले उत्तर प्रविष्ट करा

5 + 12 =