Partner lavakar shant hot nahi

1,612
प्रश्नोत्तरेPartner lavakar shant hot nahi
Anonymous asked 6 years ago

Maza partner khup vel karato. Tumhala patnar nahi pan to sadharan 20 minute karato. Pratyek veli to itaka vel gheto.To lavakar shant hot nahi. Tyachyat kahi problem aahe ki asa asu shakat.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

1 Answers
let's talk sexuality answered 6 years ago

‘जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती’. प्रत्येकाचा संभोग करण्याचा वेळ वेगवेगळा असू शकतो. याला अनेक कारणं असू शकतात. अनेकवेळा लिंगाचा ताठरपणा जास्त काळ टिकण्यामुळं संभोगाचा वेळ वाढू शकतो. जोपर्यंत संभोग करणाऱ्या दोन्ही जोडीदारांना यामुळे काहीही त्रास होत नसेल तर यात काहीही गैर नाही. परंतू जर जास्त काळ संभोग केल्यामुळं जोडीदाराला त्रास होत असेल तर  त्यासाठी विविध उपाय करता येतील. जसं जास्त काळ हस्तमैथुन किंवा मुखमैथुन करणं इत्यादी. जर जास्त काळ चालण्याऱ्या संभोगाचा काही त्रास होत नसेल तर संभोगाचा आनंद घ्या. संभोग जास्त वेळ चालतो की कमी यापेक्षा तो किती सुखद, मजेशीर आणि आनंद देणारा होतोय यावर भर द्या. आपल्या समाजामध्ये जास्त वेळ संभोग केला की जास्त लैंगिक सुख किंवा समाधान मिळते असा गैरसमज आढळतो. काहीजण संभोगाचा कालावधी वाढवण्यासाठी औषधेही घेतात.   पण यात काहीही तथ्य नाही. संभोगाचा कालावधी वाढवण्यासाठी  जोडीदार काही औषध तर घेत नाही ना याविषयी त्याच्याशी संवाद साधा. जर तुम्हाला जोडीदाराच्या जास्त वेळ संभोग केल्यामुळे त्रास होत असेल तर  त्याविषयी मोकळेपणाने जोडीदाराशी बोला.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Your Answer

6 + 12 =