प्रश्नोत्तरेCategory: Public Questionspatniche weight ani pregnency yacha kahi samband asto ka?

**

1 उत्तर

आईचे वजन व गर्भधारणेचा संबंध असतो. स्त्रियांमध्ये लठ्ठपणामुळे होर्मोनल असंतुलन होऊ शकते ज्यामुळे अंडोत्सर्जन (ovulation) आणि मासिक पाळीच्या समस्या निर्माण होऊ शकतात. लठ्ठपणामुळे स्त्रियांना स्वस्थ वजन असलेल्या स्त्रियांपेक्षा गर्भधारणेसाठी अधिक काळ लागू शकतो. गर्भधारणेदरम्यान बऱ्याचदा गर्भपात, अकाली जन्म यासारख्या गुंतागुंतींचा धोका होऊ शकतो.

लठ्ठपणामुळे गर्भधारणेदरम्यान गर्भधारणेचा मधुमेह (gestational diabetes) आणि प्री-एक्लॅम्पसिया(Preeclampsia मध्ये आईला उच्च रक्तदाबाचा त्रास होतो, ज्यामुळे गर्भाला रक्त पुरवठा कमी होतो. याचाच दुसरा अर्थ असा होतो की गर्भाला पुरेसे पोषण व ऑक्सिजन मिळत नाही. अशा आजारांचा समावेश होऊ शकतो. तसेच मृतबालक जन्मणे किंवा बाळाला जन्मजात विकृतीही होऊ शकते.

तुर्तास या सर्व शक्यता आहेत, प्रत्येकाच्या शारीरिक रचनेनुसार वा स्वास्थ्यानुसार बदल होत असतात. त्यामुळे जर आपल्याकडे लट्ठपणाची काही समस्या असेल व आपण बाळाबाबत काही नियोजन करत असाल तर आपल्या डॉकटरांशी बोलून घेऊ शकता.

अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा.

https://letstalksexuality.com/polycystic-ovarian-syndrome/

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 6 =