प्रश्नोत्तरेPeriods mde and muton khat aselती tr pregnant raht nahi ka

1 उत्तर

चूक आहे. हा गैरसमज आहे. गर्भधारणा कशी होते, त्याचे विज्ञान काय आहे ते समजून घ्या. खाली एका लेखाची लिंक देत आहोत. तो लेख वाचा.

मांसाहारामुळे शरीराची प्रथिनांची गरज भागवली जाते. त्यातून ताकद मिळते. विशेषतः आपल्यासारख्या गरिबीचे प्रमाण अधिक असलेल्या समाजात मुलं, स्त्रिया कुपोषण, रक्तअप्लता (अनिमिया) अशा स्थितीचा सामना करतात. त्यांना मांसाहारापासून परावृत्त करणं म्हणजे त्यांना अनारोग्याच्या दिशेने ढकलण्यासारखे आहे. मुठभर उच्चवर्णीय समूहांची ढोंगी शाकाहारी मानसिकता जन सामन्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न आपल्या आजूबाजूला होताना सध्या दिसत आहे. त्यापासून सावध राहू या.

शिवाय पाळीचा आणि खाण्या-पिण्यावरील निर्बंधांचा तसा अर्थार्थी काही संबंध नाही. काही मंडळी हे गैरसमज, ज्यांना कुठलाही वैज्ञानिक आधार नाही, पसरवू पाहत आहेत. त्यांना आजकाल चांगले पाठबळही मिळते आहे. पण हे गैरलागू विचार लवकरच संपतील, कारण त्यांना कसलाही आधार नाही.

letstalksexuality.com/conception/

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 18 =