personal asked 9 years ago

mla mahit ahe ha prashn ithe relate hot nahi.
tri pn ek opinion mhnun mi vichart ahe

majhe n majhya preyasi che satat bhandan hot rahtat.
kdhi call vrun kdhi reply n dilya mule v ushira dilelya karna vrun.

2 diwas bhandn hotat mg punha bolayla lagto mg punha bhandan hotat.

aaj 2 varsh hotat amchya premala
mla majhe prem tikvayche tila khush pahayche ahe mi kay kru

majha swabhaw ksa bdlu..

if u have answer then please u should be say me..

I m waiting.

1 उत्तर
Answer for personal answered 9 years ago

इतका छान प्रश्न विचारला आहेत तुम्ही. आणि हा प्रश्न इथे रिलेट होतोच. कारण लैंगिकतेबद्दल बोलायचं म्हणजे फक्त सेक्सबद्दल बोलायचं असं नाही. प्रेम, नातेसंबंध, स्वातंत्र्य, नियंत्रण अशाच सगळ्याच गोष्टींबद्दल आपण बोलायला पाहिजे.
तुम्ही आणि तुमची प्रेयसी ज्या गोष्टीवरून भांडता ती बहुतेक सगळ्याच प्रेमसंबंधांमध्ये घडत असते. आपला असा समज असतो की आपण प्रेमात पडलो म्हणजे आपल्या प्रेयसी किंवा प्रियकराने सदैव फक्त आपल्यासाठी उपलब्ध असायला पाहिजे. फोन केला की लगेच उत्तर द्यायला पाहिजे, फोन अगदी एका रिंगमध्ये उचलायला पाहिजे. दिवसातून अमुक तमुक वेळा मेसेज केला पाहिजे, सांगू तेव्हा भेटायला आलं पाहिजे… यादी खूप मोठी आहे. या सगळ्यातून आपलं एकमेकांवर प्रेम आहे हे सिद्ध होतं असं काही तरी आपल्या मनात असतं. आतुरता असते, प्रेमात असं वागायचं असतं असं वाटत असतं आणि माझ्या प्रेयसी किंवा प्रियकरावर फक्त माझा हक्क आहे, तिने किंवा त्याने दुसरं काही न करता फक्त माझ्यासाठी वेळ दिला पाहिजे असं काही तरीसुद्धा आपल्याला वाटत असतं. आणि इथेच खरी आपली गल्लत होते.
प्रेम म्हणजे आपल्या जोडीदाराला बांधून टाकणं आहे का? किंवा प्रेम म्हणजे फक्त आपला जोडीदार, बाकी काही नाही असं जखडून टाकणं आहे का? तर याचं उत्तर आहे ‘नाही’. आपण प्रेमात पडलो तरी आपली बाकी नाती, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, आपल्या आवडी-छंद, अभ्यास, काम सगळं काही एका क्षणात संपत नाही. या सगळ्या गोष्टीही आपल्या आयुष्यात तितक्याच महत्त्वाच्या असतात. त्यामुळे माझ्या प्रेयसी किंवा प्रियकराने इतर काही न करता फक्त मलाच वेळ द्यावा ही अपेक्षा थोडी चुकीचीच आहे. 
आपला आपल्या जोडीदारावर विश्वास असेल तर फोन नाही घेतला, उशीरा उचलला, मेसेजला रिप्लाय दिला नाही अशा साध्या साध्या गोष्टींनी आपण नक्कीच रुसून बसणार नाही. पूर्वीच्या काळी जेव्हा फोनही नव्हते, तेव्हाही लोक प्रेम करतच होते. पत्र लिहून एकमेकांपर्यंत आपल्या भावना पोचवतच होते की. मग आता आपण अशा अपेक्षा थोड्या दूर ठेवायला शिकू या का?
तुम्हाला काय घडतंय ते समजतंय ही फारच छान गोष्ट आहे. काही काळ तुमच्या मनातल्या अपेक्षा जरा दूर ठेवा. नाही फोन उचलला तरी ती कामात असेल असा विचार करा आणि तुमच्या तुमच्या कामात लक्ष द्या. समजा नाही एक दिवस बोलणं झालं तरी जग इकडचं तिकडे होत नाही. सततचा संपर्क तुम्हाला आवडत असेल पण त्यातून आपल्या जोडीदाराशी भांडणंच होणार असतील तर तो काय कामाचा?
तुम्हाला तुमचा स्वभाव नक्की बदलता येईल. स्वतःला आणि तुमच्या जोडीदाराला आपापली स्पेस मिळणं गरजेचं आहे. हे अंतर तुम्हाला एकमेकाच्या जास्त जवळ आणेल.
तुम्ही काय प्रयत्न केलात ते आम्हाला नक्की कळवा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 12 =