mi sex kela hota pn mi i pill 48 hours nanatar dili.ata tila 4 divas jhale blooding hotay .mag ti preganatahe ka ?? ticha masik pali nanatar 3 divasani bina condom sex kela hota .ti preganat asu shakate ka ??
नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी आणि सुरक्षित लैंगिक संबंधांसाठी कंडोमचा वापर हा एक सुरक्षित पर्याय आहे. i pill सारख्या गोळ्या या इमर्जन्सीमध्ये घेण्याचे गर्भनिरोधक साधन आहे. याचा स्त्रिच्या शरीरावर परिणाम होत असतो. केवळ स्त्रियांनाच गर्भनिरोधाकाचा वापर करायला लावणे चुकीचे आहे. कारण गर्भानिरोधाकांचा वापर ही पुरुष आणि स्त्री दोघांचीही जबाबदारी आहे.
सेक्स नंतर मासिक पाळी चुकली तर गर्भधारणा होऊ शकते. तुमच्या मैत्रिणीला रक्तस्त्राव होत असेल तर गर्भ राहण्याचा काही प्रश्न नाही. परंतू हा रक्तस्त्राव मासिक पाळीचा आहे का? की इतर कोणत्या कारणाने होत आहे? हे समजणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्यक्ष डॉक्टरांना भेटणे योग्य ठरेल.
पुढच्या वेळी कंडोमचा वापर करायला विसरू नका.