Pregnancy) asked 6 years ago

Mazi girlfriend 1mahina pregnent aahe.aamhi laganhi karanar aahot pan atta amhala abortion karayche aahe . Tiche age 20 aahe. City-kolhapur.

1 उत्तर
Answer for Pregnancy) answered 6 years ago

तुमची गर्लफ्रेंड 1 महिन्याची गरोदर आहे हे तुम्हाला कसे कळाले ? तुम्हांला घरी प्रेग्नन्सी किटच्या सहाय्याने गरोदर आहे हे समजले आहे? टेस्ट केल्या नंतरही डॉक्टर कडून प्रेग्नंसी कन्फर्म केलेली योग्य. एखाद्या फिजिशियन अथवा स्त्री रोग तज्ञ यांना प्रथम भेटा. प्रेग्नंसी कन्फर्म करा. गर्भधारणा किती दिवसांची आहे तेही तुम्हाला कळेल. प्रेग्नंसी असेल आणि मूल नको असेल तर योग्य त्या वैद्यकीय सल्ला घेऊन गर्भपात करणे हाच एकमेव सुरक्षित पर्याय आहे. कुठल्याही सरकार मान्य गर्भपात केंद्रात तुम्हाला ही सेवा मिळायला हवी.

कृपया वैद्यकीय सल्ल्याशिवाय इतर कोणीही सुचविलेली गोळ्या, औषधे किंवा इतर घरगुती उपाय करू नका. अशा उपायांनी खात्रीशीर गर्भपात होण्याची शक्यता कमी असते शिवाय त्याचे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतात.

अधिक माहितीसाठी तुम्ही 9075 764 763 या मर्जी हेल्पलाईनला सोमवार ते शुक्रवार, सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळामध्ये फोन करू शकता. या हेल्पलाईन विषयीच्या अधिक माहितीसाठी खालील लिंक वरील लेख वाचा.

नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी व सुरक्षित लैंगिक संबंधांसाठी कंडोमचा वापर हा एक सुरक्षित पर्याय आहे.

गर्भपात म्हणजे काय व त्यासंबंधी माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/abortion/

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 5 =