प्रश्नोत्तरेCategory: Public Questions12 वर्षाची मुलगी गरोदर होते का?
1 उत्तर

गरोदर राहण्यासाठी मुलीची मासिक पाळी चालू झालेली असणं गरजेचं असतं. जर पाळी सुरू झाली असेल, एखाद्या पुरुषाबरोबर लैंगिक संबंध आले असतील, वीर्याचा योनीमार्गाशी संपर्क आला असेल तर १२  व्या वर्षीदेखील गर्भधारणा होऊ शकते. अशा अनेक मुली आहेत ज्यांना असं गरोदरपण सहन करावं लागत आहे आणि याचे त्यांच्या आरोग्यावर आणि संपूर्ण आयुष्यावरच अतिशय गंभीर परिणाम होतात.
मुळात १२ व्या वर्षी लैंगिक संबंध येणं हा कायद्याने गुन्हा आहे. संमती देण्याचं किंवा लैंगिक संबंध म्हणजे काय, संमती म्हणजे काय हे कळण्याचं हे वय नाही. त्यामुळे इतक्या लहान वयाच्या मुलीबरोबर जर कुणी जबरदस्तीने किंवा फसवून, लबाडीने लैंगिक संबंध ठेवत असेल तर त्यांच्यावर बलात्काराचा आणि बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल होऊ शकतो.

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 1 =