Pregnancy baddal asked 8 years ago

Majhya gf sobat mi khoop wela sex kele ahe pn darweli protection vaprto.tiche periods chi date mage pudhe hote.atta 2 divsapurvi pn sex kele amhi ani tila i pill dili tyach divshi pn tila atta kordya ultya hotayt ani tine pregatest keli asta ti pregnent ahe.atta kay karu dr kade yayla tayyar nahi ani abortion karayla pn tayyar nahi.ani tichi periods chi date 1-6 madhe ahe pn ya month madhe tila periods aale nahit plz help.ani tila he mul have ahe pn khoop problem hoeil ya mule.plz help.

1 उत्तर
Answer for Pregnancy baddal answered 8 years ago

प्रिय मित्र,
तुम्ही तुमच्या नात्याच्या दृष्टीने खूप नाजूक स्थितीत आहात. तुमच्या प्रश्नावरून तुम्ही या स्थितीविषयी पुरेसे गंभीर आहात हे दिसतंच आहे. तुमच्या प्रश्नावरून एक- दोन शंका येतात. तुम्ही म्हणता तुम्ही नेहमी प्रोटेक्शन वापरता. मग या वेळेस वापरले नाही का? आय पिल हे इमर्जन्सी गर्भ निरोधन आहे. ते नियमित गर्भ निरोधन म्हणून वापरणं चुकीचं आहे. त्याचे दुष्परिणाम तुम्हाला नाही पण तुमच्या जोडीदाराला संभवतात. शिवाय ते साधन म्हणून खात्रीशीर नाही. पाळीची तारीख आणि शरीर संबंधांची सुरक्षितता यांचा संबंध लावण्यात काही हाशील नाही किंवा ते गर्भ निरोधनाचे साधन नाही.
तुम्ही दोन दिवसांपूर्वी संबंध आले म्हणता आणि लगेच कोरड्या उलट्या सुरु झाल्या असं लिहिलं आहे. असं होत नसतं.
खालील काही गोष्टी तुम्ही दोघांनी तत्काळ करायला हव्यात असं वाटतं.
१. एखाद्या फिजिशियन अथवा स्त्री रोग तज्ञ यांना प्रथम भेटा. प्रेग्नंसी कन्फर्म करा. गर्भधारणा किती दिवसांची आहे तेही तुम्हाला कळेल. प्रेगा टेस्ट केल्या नंतरही डॉक्टर कडून प्रेग्नंसी कन्फर्म केलेली योग्य.  
२. प्रेग्नंसी असेल आणि मूल नको असेल तर गर्भपात हाच पर्याय आहे. कुठल्याही सरकार मान्य गर्भपात केंद्रात तुम्हाला ही सेवा मिळायला हवी.
३. तुमच्या जोडीदाराला मूल हवं आहे पण तुम्हाला हवं आहे का? तुमचं मत तुम्ही तुमच्या जोडीदाराला सांगितलं आहे का? तुम्ही तुमच्या जोडीदाराला काही आश्वासन दिले आहे का? तसे असेल तर ती आश्वासनं पाळणं तुमचं कर्तव्यच आहे.
हा तुमच्या दोघांच्याही आयुष्यातील मोठा निर्णय असणार आहे. मुलाच्या अनुषंगाने येणारे लग्न, एकत्र सहजीवन, कौटुंबिक मुद्दे, आर्थिक बाबी अशा एक न अनेक मुद्द्यांवर तुम्हाला सारासार विचार करून निर्णय घ्यावा लागेल. अर्थात हे तुम्ही जाणताच. सांगायचा मुद्दा एवढाच आहे कि तुम्ही दोघांनी एकमेकांशी बोलून, एकमेकांना विश्वासात घेऊन निर्णय घेणं गरजेचं आहे. तुम्ही प्रेमात आहात, कमिटेड दिसताय मग लग्न करण्यात काही समस्या आहे हे का? या बाबतही तुम्हाला एकमेकांना स्पष्टता आणून द्यावी लागेल. लक्षात ठेवा या सर्व गोष्टींचा तुमच्या जोडीदारावर, तिच्या शरीरावर आणि एकूणच आयुष्यावर अधिक परिणाम होणार आहे. तिला सारासार विचार करणं भागच आहे. इथे तुम्ही अधिक जबाबदारीने निर्णय घेणं अपेक्षित आहे. तेंव्हा ऑल दि बेस्ट.

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 18 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी