दोन्ही जोडीदारांची इच्छा असेल आणि काही विशिष्ट समस्या नसेल तर गरोदरपणात शरीर संबंधावर खरं तर काही निर्बंध असण्याची आवश्यकता नाही. वास्तवात गर्भ धारणा झाली आहे हे बहुतेक वेळेस दुसऱ्या महिन्यात लक्षात येते. त्यामुळे गरोदरपणाच्या अगदी प्राथमिक टप्प्यात शरीर संबंध आलेले असण्याची शक्यता असतेच. शरीर संबंधांचा गर्भावर कसलाही परिणाम होत नाही.
पूर्वी जर एकापेक्षा अधिक गर्भपात झाले असतील किंवा तसा काही इतिहास (हिस्ट्री) असेल, तर डॉक्टर बरेचदा पहिल्या काही महिन्यात शरीर संबंध टाळण्याचा सल्ला देतात. असा काही इतिहास असेल तर लिंग योनी मैथुन टाळावा. गरोदरपणात गर्भाशयाचे तोंड उघडणे किंवा रक्तस्त्राव (स्पॉटिंग) होणे गंभीर असते. अशी शक्यता वाटत असेल तर तुम्हाला शरीर संबंध टाळण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. स्त्री पहिलटकरीण असेल, तर प्रसूतीपूर्वी दोन आठवड्यादरम्यान गर्भाचे डोके मातेच्या कटीभागात उतरते. म्हणून गर्भारपणाच्या शेवटच्या महिन्यात संभोग करू नये. नंतरच्या गर्भारपणात असे होत नाही, म्हणून शेवटच्या महिन्यातही संभोग करायला हरकत नाही.
संपूर्ण माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://letstalksexuality.com/sex-during-pregnancy/
शिवाय बाळंतपणानंतरचे लैंगिक संबंधांबद्दल अधिक वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा..