मनात लैंगिक भावना निर्माण झाल्या की लिंग ताठ होण्याचा अनुभव अनेक मुलांना, पुरुषांना येतो. त्यात घाबरण्यासारखं काही नाही. मात्र कोणत्याही मुलीकडे पाहिल्यावर असं होत असेल तर आपली नजर थोडी बदलण्याची गरज आहे. मुलीचं शरीर पाहिल्यावर मनात फक्त लैंगिक भावना येत असतील तर थोडा विचार करा. मुली किंवा स्त्रियांचं शरीर म्हणजे फक्त सेक्सची भावना निर्माण करणारी गोष्ट नाहीये. त्या स्वतंत्र व्यक्ती आहेत आणि त्यांच्या शरीराचा आदर करायचा प्रयत्न करा. पुरुषांची किंवा मुलांची अशी त्यांच्या छातीकडे किंवा पाठीमागे नितंबांकडे पाहणारी नजर मुलींना अस्वस्थ करू शकते, भीती निर्माण करू शकते. ते टाळणं तुमच्या हातात आहे.
तुम्हाला जे वाटतंय त्यात काही चुकीचं नाही मात्र नजर बदललीत तर तुमचं तुम्हालाच अधिक मोकळं आणि छान वाटेल.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा