1 उत्तर
जोडीदारांनी एकमेकांच्या लैंगिक अवयवांना जिभेने चाटणे अथवा लिंग तोंडात घेणे याला मुखमैथुन असं म्हणतात. जर दोन्ही जोडीदारांची इच्छा असेल, दोघांनाही त्यातून आनंद मिळत असेल तर त्यात गैर काही नाही. मात्र जबरदस्तीने जर असं कुणी करत असेल तर ते चुकीचे आहे. इच्छेविरुद्ध केली जाणारी कोणतीही लैंगिक कृती, लैंगिक संबंध हे कायद्याने गुन्हा आहे. तुम्हाला जर लिंग तोंडात घेणे आवडत नसेल स्पष्टपणे जोडीदाराला तसं सांगा. ठामपणे ‘नाही’ म्हणून सांगा.
आपले उत्तर प्रविष्ट करा