खरंतर सेक्स करताना त्रास होईलच असे नाही. बरं एखाद्यावेळी त्रास झालाच तर प्रत्येकवेळी तोच त्रास होईल असेही नाही. म्हणूनच पुरुषाला काय किंवा इतर कुणाला काय, सेक्स करताना काय त्रास होतो याचे नेमके उत्तर नाही. तुमचे जर काही असे त्रास झाल्याचे अनुभव असतील तर नेमका काय त्रास झाला ते नेमकेपणाने सांगा.. अगदी बिनधास्त… मोकळेपणाने… आपण त्याचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू.
प्रत्येकाचे सेक्सचे अनुभव वेगवेगळे असतात त्यामुळे तुम्हाला जर कुणी पुरुषांना सेक्स केल्याने त्रास होतो असे सांगितले असेल तर तुमचाही तोच अनुभव असेल असं नाही. काहीही शास्त्रीय आधार नसलेल्या ऐकीव माहितीवरून मनात भीती बाळगू नका.
सेक्स करावासा वाटणं ही एक नैसर्गिक भावना आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या जास्त जवळ जावंसं वाटत असतं किंवा जेव्हा तुम्ही लैंगिकदृष्ट्या उत्तेजित झालेले असता तेव्हा तुम्ही सेक्स करता किंवा तुम्हाला सेक्स करण्याची इच्छा निर्माण होते. सेक्स करण्यामध्ये, प्रेम करण्यामध्ये आणि शरीर संबंध ठेवण्यामध्ये पाप किंवा घाण असं काही नाही. आपली जवळीक आपण या क्रियांमधून व्यक्त करत असतो. मात्र ही जवळीक दोन्ही जोडीदारांच्या संमतीने व्हायला हवी. सेक्स करताना परस्पर संमती, आदर, विश्वास, सुरक्षित लैंगिक संबंध, गर्भनिरोधकांचा वापर हे मात्र महत्वाचे !